जगदीश मुळीक, हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आपल्याला परिचित आहेत
पुण्यातील वडगाव शेरी भागातील मुळीक कुटुंबियांची ओळख पुणेकरांना आहेच.
सचोटीने आपला उद्योग व्यवसाय करण्याबरोबर आपण आपल्या समाजाचे ,राष्ट्राचे काही देणे लागतो आणि ते आपण आपल्या परीने देण्याचा प्रयत्न करावा आणि सामाजिक बांधिलकी मानून काही समाज सेवा करावी हा संस्कार जगदीश मुळीक यांना घरातूनच मिळाला. त्यातूनच ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि विविध विषयावर त्यांनी कार्य सुरु केले. कामाची उमेद आणि जिद्द या मुळेच पुणे महानगर पालिकेत त्यांनी आपल्या कामाचा एक ठसा उमटवला, महानगरपालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीवर देखील त्यांनी काम केले आहे. भारतीय जनता पक्षात विद्यार्थी आघाडी पासून कार्याला सुरुवात केलेले जगदीशजीनी पक्षाच्या महत्वाच्या शहर सरचिटणीस म्हणून देखील जबाबदारी यशस्वीपणे घेतली होती.
सन २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी जगदीश मुळीक यांना बहुमताने निवडून दिले.आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक तरूण आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली.

मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी गोलाची, तू चाल पुढ तुला रं गड्या भिती कश्याची ?
या ओळीं प्रमाणे जगदीशजींची वाटचाल चालू आहे आणि राहील

नांव : श्री जगदीश तुकाराम मुळीक
संपर्क :
१) स. नं. २८, रामवाडी पोलीस चौकी शेजारी नगर रोड,
वडगावन्शेरी, पुणे -१४ मो. ७५०७११५५९९/८३९०११५५९९

२) सिद्धिविनायक मंदिरा जबळ, प्रसाद नगर,
वडगावन्शेरी, पुणे -१४ मो. ९६२३४४५५५५ / ८६९८११५५९९

निवास : स. नं. १३, त्रंबकेश्वर सोसायटी,
वडगावन्शेरी, पुणे -१४

जन्मतारीख : ०१ एप्रिल १९८१
शिक्षण : बी. ए.
व्यवसाय : बांधकाम व्यवसाय / शेती
भ्रमणध्वनी : ०९८९०८१११११
वडील : श्री. तुकाराम सोपानराव मुळीक
बंधू :१) श्री. योगेश तुकराम मुळीक -नगरसेवक, पुणे म. न . पा .
२) श्री. विशाल तुकराम मुळीक – बांधकाम व्यवसाय

भूषविलेली जबाबदारी
सन २००१ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा विध्यार्थी आघाडी पुणे शहर सरचिटणीस
सन २००५ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्त
सन २००५ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा वृक्षसंवर्धन समिती सदस्त
सन २००५ : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष
सन २०११ : भारतीय जनता पार्टी पुणे शहर चिटणीस
सन २०१३ : भारतीय जनता पार्टी पुणे शहर सरचिटणीस
सन २०१४ : आमदार,२०८- वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ.

तरी पण ज्या वडगाव शेरी मतदार संघाचे ते प्रतिनिधित्व करतात त्यातील नागरिकांना आवश्यक अशा रस्ता,पाणी ,वीज ,वाहतूक ,आरोग्य ,साफसफाई या स्थानिक विषयांबरोबर शासनाच्या निधीतून करावयाची विविध विकास कामे तसेच समूहांचे धोरणात्मक विषय असोत किंवा कायदे करणे असोत ह्या सर्व बाबतीत ते प्रामाणिक प्रयत्न करतात आणि कायमच करत आले अहेत.

आपण किती काम केले त्याही पेक्षा आपण अजून किती काम करायचे आहे हे ते नेहेमी पाहत असतात. आपल्या सगळ्यांचे सहकार्य आणि आशीर्वाद आहेत व राहतीलच.